0 0
Read Time:4 Minute, 48 Second

विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ
पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या शिष्टमंडळाने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्री अनिल पाटील यांची घेतली भेट.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर राजकोट किल्ला पर्यटक ,शिवप्रेमी जनतेसाठी बंद करण्यात आला आहे या विषयी पर्यटक व्यावसायिक महासंघाच्या पदाधिकारी यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्री अनिल पाटील यांची भेट घेऊन राजकोट किल्ला पर्यटक व शिवप्रेमी साठी खुला करण्याची मागणी केली आहे.यावेळी पर्यटन महासंघाचे अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांनी सांगितले की १६६४ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला राजकोट किल्ला पूर्ण पणे नष्ट झालेला होता राज्य सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या ऐतिहासिक राजकोट किल्ला जिल्ह्याचे पालकमंत्री,राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून पुनर्जीवित करण्यात आला सर्व शिवप्रेमी साठी ही अभिमानास्पद बाब आहे.
या राजकोट किल्ला उभारणी झाल्यावर पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने सर्व शिवप्रेमी,जिल्हा प्रशासन,स्थानिक ग्रामपंचायत यांना सोबत घेऊन जिल्ह्यातील 30 गडकिल्ल्यावरील माती तसेच शिवनेरी व रायगड गडावरील माती कलश यात्रेच्या माध्यमातून भूमी कलश विधिवत पद्धतीने पालकमंत्री श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून राजकोट किल्ल्यावर स्थापित केला आहे.
सदर किल्यावर नेव्ही च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता जो कोसळून पडला आहे निच्छितच ही गोष्ट आम्हा शिवप्रेमींसाठी दुःखद आहे.
पर्यटन व्यावसायिक महासंघाची विनंती की छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेले गड किल्ले शिवप्रेमींसाठी प्रेरणादायी असून राजकोट किल्लाही जलकोट साक्ष देणारा इतिहास असून त्या जागी नवीन शिवपुतळा उभारणी साठी काही महिन्याचा कालावधी जाऊ शकतो तो पर्यंत राजकोट ऐतिहासिक किल्ला शिवप्रेमींच्या दर्शनासाठी बंद न ठेवता ज्या ठिकाणी सर्व गडकिल्याची माती स्थापित केलेल्या भूमी कलश स्थापित केला आहे त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात शिवप्रतिमा (फोटो )स्थापित करून राजकोट किल्ला शिवप्रेमी साठी खुला करण्यात यावा ही विनंती.केली असून यावर जिल्हाधिकारी यांनी या विषयी लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे श्री अनिल पाटील जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी सांगितले अशी माहिती विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी दिली यावेळी श्री किशोर दाभोलकर सोशल मीडिया अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ,टी टी डी एस अध्यक्ष श्री सहदेव साळगावकर टीटीडीएस कार्याध्यश श्री रविंद्र खानविलकर पर्यटन व्यावसायिक महासंघ मालवण शहर अध्यक्ष श्री मंगेश जावकर, श्री मिलिंद झाड श्री रामा चोपेड़ेकर ,श्री मिलिंद झाड़ श्री मनोज खोबरेकर,श्री दर्शन वैंगुर्लेकर आदी पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

सोलर रूफ टॉप