दि.२२ डिसेंबर रोजी पेंडुर येथील प्राचिन जैन मंदिर आणि परिसरातील जैन मंदिराच्या अवशेषांचे शोध घेऊन ते संरक्षित करणे त्याकरिता संग्रहालयाची आवश्यकता आहे. हजारो वर्षांपूर्वीच्या जैन शिल्पकृती कायम स्वरूपी एका छताखाली राहून आश्रय मिळणे आवश्यक आहे.. मंदिर परिसरातील विरगळ,त मूर्त्यां, मंदिर अवशेषाना एकत्रित करून शिल्प संग्रहालय केल्यास जिल्ह्यातील पर्यटनाला एक वेगळं महत्व प्राप्त होईल. तसेच पेंडूर गावचे पर्यटन दृष्ट्या महत्व वाढेल आणि त्यातून स्थानिक रोजगार निर्माण होईल. त्या मुळे या भग्नावशेषांचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी कोकण पर्यटन महासंघामार्फत भारत पर्यटन, मुंबई यांचेकडे पाठपुरावा करत आहोत. तसेच पेंडूर हे गांव पालकमंत्री मा.श्री. रविंद्रजी चव्हाण यांची जन्मभूमी असल्याने त्यांच्या कडेही पाठपुरावा करत आहोत.

सततच्या निसर्गाच्या ऊन पावसाच्या माऱ्यामुळे सुमारे १२०० वर्ष पुराण्या मुर्त्याचा रेखीवपणा पण कमी होत चाललेला आहे. त्यामुळे काही वर्षांनी हा अमूल्य ठेवा इतिहासातून लोप पावू शकतो त्यावेळी विषयावर गांभीर्याने विचार करुन कार्यवाही होणे गरजेचे आहे. कट्टा येथील जैन विहीर,रस्त्यालगतची जैन धर्मगुरूंची समाधी,या अनुषंगाने निर्माण झालेल्या लोक कथा , पंचक्रोशीतील धामापूर,काळसे, कट्टा, खरारा, मोगरणा, पोईप, विरण, ह्या सर्व भागातील पुरातन ठेव्याची जपणूक व्हावी.तसेच पर्यटकांना गाईड ठरेल अशी पुस्तिका निर्माण करणे,अश्या विषयावर चर्चा होऊन कामाला सुरुवात झाली .कोकण इतिहास परिषद, इतिहास संकलन समिती, गिर्यारोहण संघटना, डिस्कव्हरी ऑफ सिंधुदुर्ग व पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकण विभाग यांच्या सामूहिक प्रयत्नातून संपूर्ण जिल्ह्यातील अंदाजे २०० हुन जास्त प्राचीन स्थळांचा शोध घेऊन तो संरक्षित करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याचा शुभारंभ पेंडूर गावातून होत आहे.

या साठी गावातील देवस्थान कमिटी अध्यक्ष श्री. शिवराम पटेल-सावंत,सरचिटणीस श्री. अमित रेगे-कुलकर्णी, माजी सरपंच श्री. महेश धाकोजी सावंत-पटेल, डिस्कव्हरी ऑफ सिंधुदुर्ग ,कोकण इतिहास परिषद सिंधुदुर्ग, इतिहास संकलन समिती सिंधुदुर्ग,व गिर्यारोहण संघटना सिंधुदुर्ग चे अध्यक्ष श्री.प्रकाशजी नारकर, तसेच पर्यटन व्यवसायिक महासंघ कोकण विभाग अध्यक्ष श्री.विष्णू मोंडकर,सोशल मिडिया प्रमुख श्री. किशोर दाभोलकर, मालवण तालुकाध्यक्ष श्री. अविनाश सामंत, मालवण शहर अध्यक्ष श्री.मंगेश जावकर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली.