Gradian MinisterRavindra Chavan
0 0
Read Time:4 Minute, 39 Second

श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकण

सिंधुदुर्ग,पालघर पालकमंत्री श्री रविंद्रजी चव्हाण व माजी खासदार श्री निलेश राणे यांचे पर्यटन महासंघाकडून विशेष अभिनंदन.

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित होऊन 28 वर्षे झाली असून सिंधुदुर्ग जिल्हा सोबत कोकण किनारपट्टीवर स्थानिक भूमिपुत्र पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत पर्यटंकाना सुखसुविधा निर्माण करताना आपल्या राहत्या जागेत होम स्टे, न्याहरी निवास कृषी पर्यटन प्रकल्प उभारून पर्यटन सेवा देत आहेत परंतु अश्या प्रकल्पासाठी सरकारची कुठलीही पॉलिसी नसल्याने प्रत्येक पर्यटन व्यवसायीकांना अकृषिक कर दंडापोटी हजारो रुपये शासनाला जमा करावे लागत होते याविषयी टी टी डी एस व पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने स्थानिक प्रशासन तसेच राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केला होता यांची दखल घेऊन महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशन 2023 मध्ये पर्यटन व्यावसायिक महासंघाने अकृषिक कराविषयी दिलेल्या निवेदनावर सकारात्मक चर्चा झाली होती.हल्लीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री रवींद्रजी चव्हाण यांनी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी टी टी डी एस व पर्यटन व्यावसायिक महासंघाने अकृषिक करा संबधी त्यांचे लक्ष वेधले होते त्यावेळी त्यांच्या सोबत माजी खासदार श्री निलेश राणे उपस्थित होते यावेळी त्यांनी सदर विषय हा राज्य सरकारचा पॉलिसी मॅटर असून लवकरच यावर आम्ही एकत्र मार्ग काढू असे सांगितले होते. आणि जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना सदर कर आकारणी साठी स्थगिती चे आदेश दिले होते काल झालेल्या राज्य मंत्री मंडळाच्या मिटींग मध्ये अकृषिक कर आकारणी रद्द करण्याचा निर्णय घेऊन श्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी पर्यटन व्यावसायिक महासंघास दिलेल्या शब्दाची वचन पूर्ती केली आहे या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 2000 पेक्षा जास्त होम स्टे धारकांना लाभ होणार असून कोकणातील 10000 पेशा जास्त पर्यटन व्यवसायिकांना लाभ होणार आहे त्याचबरोबर जिल्ह्यातील 121 की.मी. वर राहत असलेल्या 25000 पेक्षा जास्त मच्छिमार कुटूंबाच्या राहत्या घरासाठी आकारण्यात आलेल्या अकृषिक करापासून कायमची मुक्तता होणार आहे हा निर्णय या निर्णयामुळे कोकण किनारपट्टीवरील मच्छिमार व पर्यटन व्यावसायिकांसाठी नवसंजिवनि देणारा ठरणार असून सामान्य नागरिकाचे 250 कोटी पेक्षा जास्त रक्कम माफ होणारी आहे. याबद्दल राज्य सरकार चे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे श्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री अजित पवार तसेच विशेष आभार सिंधुदुर्ग,पालघर पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण व माजी खासदार श्री निलेश राणे यांचे विशेष अभिनंदन केले आहे अशी माहिती श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ व महाराष्ट्र मत्स्यधोरण समिती सदस्य यांनी दिली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

सोलर रूफ टॉप