अन्न सुरक्षाअन्न सुरक्षा
0 0
Read Time:3 Minute, 18 Second

खाद्यपदार्थाची निगडित असलेल्या सर्व व्यावसायिकांची अन्नसुरक्षा विभागाकडून अचानक तपासणी होणार आहे.
यात किती जणांची अन्नसुरक्षा विभागाकडे नोंदणी तसेच परवाना आहे याची तपासणी होणार आहे. त्यात नोंदणीकृत नसलेल्या व्यवसायिकांना त्याचा त्रास सहन करावा लागेल. जे व्यावसायिक नोंदणीकृत नसतील अशा व्यवसायिकांनी आत्ताच नोंदणी करून घ्यावी. जेणेकरून पुढे कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही.
आता शासनाकडून हायजिन रेटिंग स्टार टू स्टार थ्री स्टार फाईव्ह स्टार असे मानांकन केले जाते त्याकरिता शासन स्तरावर आऊटसोर्सिंग संस्थेमार्फत ऑडिट केले जाते आणि त्यानंतर दिल्लीवरून त्याच्यासाठी प्रशस्तीपत्रक जारी केली जाते.
ही संस्था दिल्ली वरून येऊन ऑडिट करते. हे जर आपण वैयक्तिक करायचे म्हटले तर त्यासाठी त्या संस्थेचे चार्जेस तसेच ऑडिट साठी जी लोक येतील त्यांचा खर्च आपणास करावा लागेल आणि तो किती येईल हे आपणांस सांगायला नको.
आपणांस जर हे ऑडिट करून घ्यायचे असेल तर पर्यटन व्यावसायिक महासंघ आपल्या नोंदणीकृत सभासदांसाठी हे ऑडिट शासन स्थरावर करून घेण्यासाठी आपणास सहकार्य करण्यास तयार आहे.

याकरिता लागणाऱ्या आवश्यक बाबी:-
अन्न आणि औषध प्रशासन नोंदणी प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, मेडिकल फिटनेस, वॉटर प्युरिफायर, ग्रामपंचायतीकडून पाणी पुरवठा होत असेल तर त्याची पावती . पेस्ट कंट्रोल प्रमाणपत्र, किचन हेडकॅप ह्या बाबींची शहानिशा सदर ऑडिटर करतील आणि त्या नंतर त्याच ठिकाणी हे ऑडिटर आपले ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतील. आपले आस्थापनेचे फोटो उपलोड करतील. त्यानंतर दिल्ली वरून आपणास प्रशस्तीपत्र जारी करण्यात येईल.
प्रत्येकाने आपल्या आस्थापनेचे हायजिन रेटिंग ऑडिट करून घेणे आवश्यक आहे.
ज्या व्यावसायिकांना आपल्या आस्थापनेचे हायजिन रेटिंग ऑडिट करायचे असेल अश्या व्यावसायिकांनी पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष श्री. विष्णू मोंडकर यांचेशी संपर्क करावा. तसेच हॉटेल महाराज या ठिकाणी नोंदणी फॉर्म उपलब्ध करून देण्यात येतील.

पर्यटन व्यावसायिक महासंघ

अध्यक्ष: श्री. विष्णू मोंडकर

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

सोलर रूफ टॉप