आपण सर्व पर्यटन व्यावसायिकांच्या सहकार्यातून आणि सहकार्याच्या विश्वासातून सुरु झालेल्या या रिक्षा रॅलीचे हे तुतीय वर्ष आहे पर्यटन वाढी मध्ये एक महत्वाचा प्रामाणिक उपक्रम आणि पर्यटन व्यवसाय वाढीसाठी केंद्रबिंदू असलेल्या रिक्षा व्यावसायिकांच्या समन्वयाने सुरु झालेल्या पर्यटन रॅली मध्ये आपण सर्व पर्यटन व्यावसायिकांनी आपल्या पर्यटन वाढीचा आणि व्यावसायिक समन्वयाचा महत्वाचा उद्देश व उपक्रम असलेल्या पर्यटन संस्कृती रिक्षा रॅली मध्ये सहभागी व्हावे. नारळी पौर्णिमा निमित्त सोमवार दिनांक 19/8/2024 दुपारी 2.45 वा भरड नाका येथे मा.खासदार श्री निलेशजी राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यटन संस्कृती रॅली चे उदघाटन होऊन मालवण भरड नाका येथून पारंपरिक वाद्य मिरवणुकी च्या माध्यमातून सदर रॅली मालवण बंदर जेटी येथे जाऊन विधिवत पध्धतीने सागरकिनारी श्रीफळ पूजन करून सागराला श्रीफळ अर्पण करून सदर रॅली ची सांगता होणार आहे.
सदर रॅली साठी आपली सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे उद्या च्या दिवसातील तीन तास आपल्या हिंदू संस्कृती साठी,पर्यटन वाढीसाठी,संघटित ऐक्यासाठी आणि संघटनेवर आपण करत असलेल्या प्रेमासाठी
उद्या भेटू
आपल्या पारिवारिक कार्यक्रमासाठी.
श्री सहदेव साळगावकर
अध्यक्ष
तारकर्ली पर्यटन विकास संस्था
श्री रविंद्रजी खानविलकर.
कार्यध्यक्ष
तारकर्ली पर्यटन विकास संस्था.
श्री अवि सामंत.
अध्यक्ष
पर्यटन व्यावसायिक महासंघ मालवण.
श्री मंगेशजी जावकर.
अध्यक्ष
पर्यटन व्यवसायिक महासंघ मालवण शहर.
श्रीमती मेघाताई गावकर.
अध्यक्ष
पर्यटन व्यावसायिक महासंघ मालवण महिला
श्री किशोर दाभोलकर
सोशल मीडिया प्रमुख.
पर्यटन व्यावसायिक महासंघ
श्री विष्णू मोंडकर.
अध्यक्ष.
पर्यटन व्यवसायिक महासंघ.