श्री विष्णू मोंडकर, अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ
कोकणाचा पर्यटनदृष्टया शाश्वत विकासासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या माध्यमातून प्रयत्न चालू असून कोकणातील जलक्रीडा,न्याहरी निवास,कृषी पर्यटन,कल्चर टुरिझम,मेडिकल,हिस्ट्री टुरिझम क्षेत्रात कार्य करणाऱ्या पर्यटन व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी आवश्यक असलेल्या शासकीय नियमावली मध्ये बदल तसेच शासन व पर्यटन व्यावसायिक यांच्यात कोकण प्रांतात पर्यटन व्यवसाय वाढीसाठी समन्वयाचे भाग म्हणून भारत सरकारच्या पर्यटन विभागाचे आदरातिथ्य आणि पाहुणचार या विषयावर दिनांक १९ मार्च २३ रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत एकदिशीय कार्यशाळेचे आयोजन माउली हॉल चिपळूण येथे येथे करण्यात आले असून श्री उदयजी सामंत ,उद्योगमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उदघाटन होणार असून श्री.प्रमोदजी जठार मा.आमदार व श्री किरण सामंत सिंधुरत्न योजना सदस्य महाराष्ट्र्र यांची उपस्थिती असणार आहे या पद्धतीची कार्यशाळा महासंघाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित करण्यात आली होती त्यांमध्ये पर्यटन व्यावसायिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला होता सदर कार्यशाळेच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्रात असलेल्या संधी,शासकीय योजना यांची माहिती दिली जाणार असून कोकणातील जास्तीत जास्त पर्यटन व्यवसायिकांनी सदर कार्यशाळेचा लाभ घ्यावा. असे आवाहन पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष श्री विष्णु मोंडकर यांनी केले आहे.