पेंडूर गावचा पूर्व इतिहास : सुमारे 2000 वर्षापूर्वीची पेंडूर गावाची आख्यायिका अशी सांगितली जाते की,फार पूर्वी या गावात पेंढरीची झाडे विपुल स्थितीत होती.त्यामुळे या गावाला पेंडूर हे नाव पडले.तर आख्यिका अशी की या गावात कोबडा आरवण्यापूर्वी 12 लिंगाची स्थापना घडली असती तर हे गाव पंढरपूर म्हणून उदयास आले असते.पंरतु 11 लिंगाची स्थापना झाल्यावर पहाट झाली.व कोंबडा आवरला म्हणून पंढरपूर न होता हे गाव प्रति पंढरपूर म्हणून पेंडूर असे नावारुपास आले.अशी या गावातील थोर वयस्कर मंडळीकडून आख्यायिका सांगितली जाते.
       सन 1925 पर्यंत पेंडूर गाव हा पुर्वी सावंतवाडी संस्थानाच्या महसूल विभागात होता.आणि ब्रिटीशांच्या काळात बेळगाव डिस्ट्रीक बोर्डच्या अंतर्गत येत असे.सदयस्थितीत पेंडूर गाव हा तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग या महसुली विभागात आहे.मालवण तालुक्यामध्ये 30 ते 35 गावांपैकी लोकवस्ती अनुसार पेंडूर गाव हे दुस-या क्रमांकावर गाव आहे.पेंडूर गावच्या सिमारेषा पुर्वेकडे वराड सिमा (धाकुर्ले गाव) पश्चिमेला काळसे धामापूरचा सडा,दक्षिणेकडे खरारेवाडीची वेस तर उत्तरेला गुरामवाड (कुणकवळे गाव) या पेंडूर गावच्या सिमा आहे.एका आदिवाशाने बाण लावून त्याचा बाण जिथे पडेल ती गावची सिमा होय.अशी या गावाची दंतकथा आहे.पेंडूर गाव हे 1) खरारे वाडी 2) मुगचे वाडी 3) वासंग वाडी 4) राय वाडी 5) सोनारवाडी 6) सावंतवाडा 7) परबवाडा 8) मोघरणे 9) भटवाडी 10)देऊळवाडी 11) तळीवाडी 12) खान वाडी अशा 12 वाडया मिळून बनलेले गाव आहे.आषाढ महिन्याच्या अमावास्येपुर्वी चार दिवस अगोदर गावाचे रक्षण सिमेवरुन,पूर्वापार पध्दतीने भात आणि भक्ष जमीनीत पुरुन ठेवले जाते जेणेकरुन गावावर कोणतेही प्रकारचे संकट,रोगराई,वादळ यापासून गावाचे रक्षण व्हावे.या सोहळयाला ” मांजरी ” (धिसरुड) असे म्हणतात.
भौगोलिक दृष्टया पेंडूर गावच्या दक्षिणेला कर्लीची खाडी आहे.तर पश्चिमेला काळसे धामापूर गावच्या डोंगराळ भाग,पुर्वेकडील भाग हा शेतमळा आणि उत्तरेकडील भाग म्हणजे पेंडूर व नांदोस या सिमेवरुन तालुक्याला जाणारा रस्ता आहे.या गावच्या क्षेत्रफळ आदमासे 100 चौ.कि.मी.आहे.
प्रति पंढरपूर ओळखल्या जाणा-या पेंडूर गावात 360 स्थळाचा अधिपती श्री देव वेताळ,स्वयंभू श्री सातेरी देवी,नवसाला पावणारा श्री देव रवळनाथ,श्री देवी पावणाई श्री देव लिंगेश्वर,श्री ब्राम्हणदेव,जैन कालीन साकिनी डाकिनी,श्री देव मारुती असे अनेक देव देवता या गावात वास्तव्यात आहेत.संपुर्ण वर्षभरात या गावात देवदेवताचे अनेक उत्सव साजरे केले जातात.
            गावच्या मध्यवर्ती पाण्याचा मोठा तलाव व तलावाच्या बांधावर श्री देवी तिळंबीचे मंदिर आहे.आणि तलावाच्या ईशान्य आग्नेय दिशेला अपधरणा टेकडी आहे व गावच्या मध्यवर्ती ठिकाणी श्री देव वेताळ मंदिर असून हे पेंडूर गावचे मुख्य ग्रामदेवत आहे व शंकराचा पहिला गण मानतात.
श्री देवी सातेरी मंदिर – या मंदिरामध्ये प्राचीन काळापासूनचे स्वयंभू मोठे वारुळ (पेड) आहे.या वारुळामध्ये भूमी देवता म्हणून पुजली जाते.आणि त्यामध्ये वास्तव्याला सर्प आहे.जर गावक-याकडून काही चूक झाल्यास सर्प दृष्टीस पडतो.अशी गावक-यची धारणा आहे.श्री देवी सातेरीच्या उजव्या बाजुला प्राचीन काळचे जैन धर्मियाची महावीर सांगाडा आणि त्यावेळच्या लेण्या मुर्त्याचे भग्न अवस्थेतील अवशेष आहेत.हे साधारणत: इ.स.पूर्वी 1000 च्या दरम्यान बहमणी आहे.राज्यकर्त्याच्या नासधुशीचे परिणाम आहेत.या जागेत ग्रामीण भाषेत संकीणी डकीणी असे संबोधले जाते.गावच्या काही डोंगराळ कपरी पुर्व काळात लोकवस्ती असावी अशी काही ठिकाणे गावात आहेत.
           श्री देव रवळनाथ मंदिर – हे मंदिर उत्तर दक्षिण दिशेला असलेले हेमाडपंथी मंदिर आहे.श्री देव रवळनाथ ही सुर्य देवता आहे.या मंदिरामध्ये श्री देवी पावणाईचे स्थान आहे आणि शेतमळया मध्ये अति प्राचीन श्री देव लिंगेश्वराचे प्रवित्र मंदिर आहे.यात गणपतीची प्राचीन मुर्ती आहे.या मंदिरात दस-याच्या वेळी देवांची लग्न होतात.अशा प्रकारे पेंडूर गावातील ही पाच मुख्य देवस्थाने आहेत.इतर ही गावातील वाडयामध्ये विठठल रखुमाई

            

देवीच्या मांडाचा कुळाचार

पेंडूर मांड उत्सव २०२२-२३

देवी जरीमरी ही अनुसूचित जातीची असल्यामुळे तिच्या ठिकाणी खरारे पेंडूर गावी श्री देव वेताळ,श्री देवी सातेरी,श्री देव रवळनाथ,श्री देवी पावणाई,श्री देव लिगेश्वर आणि श्री देव दांडेकर ही वारीरुपातील ग्राम दैवत श्री देवी जरीमरीच्या ठिकाणी उपस्थित राहतात.ज्यावेळी श्री देवी जरीमरीचे वारे महिलेच्या अंगाम येत तेव्हा वारी रुपातील श्री देव वेताळ त्या देवीच्या हातात फुल देवून तिला आपली बहिण माहेरवाशीन म्हणून घेवून देवळात सर्व ग्रामदेवतान बरोबर येतात. देवळात आल्यावर सभागृहात पुर्व तयारी केलेल्या पाटावर वारीरुपातील श्री देवी सातेरी ही श्रीदेवी जरीमरीची ओटी पाटावर मांडते म्हणुनच या जत्रेला देवीचा मांड असे संबोधतात.त्याचप्रमाणे श्री देवी सातेरी मंदिरात सुध्दा श्री देवी सातेरीची स्थापना करुन देवीचा मांड भरविला जातो.या स्थापनेपासून पुढील 14 दिवस म्हणजे 13 रात्र आणि 14 दिवस देवीचा उत्सव चालु होतो.मांडाच्या पहिले दोन दिवस रात्रीचे साधारण 10 वाजता गावच्या मंडळीच्या उपस्थितीत ग्रामदेवताची दिडी निघते.ढोलताश्यांच्या व सनईच्या तालावर ज्यावेळर दिंडी निघते.त्यावेळी वर नमुद केल्याप्रमाणे सर्व देवतांची वारी अंगात आलेली असतात.ही दिंडी श्री देव वेताळ मंदिरा सभोवती एक वेळा फिरते.नंतर देवळात येवून थांबते.या गोष्टीला " जुगापातीचा खेळ " असे संबोधले जाते.अशा प्रकारे तेरा रात्री हा जुगापातीचा खेळ रात्री बारा वाजेपर्यंत चालू असतो. मांडाच्या स्थापनेच्या तिस-या दिवशी संध्याकाळी चार वाजता पाच मानकरी बारा देव सेवक यांच्या मांडाच्या ओटया देवीला भरल्या जातात.त्यावेळी पासून सतत 14 दिवस म्हणजे मांडाच्या समाप्ती पर्यंत उत्सवाला येणारी भाविक श्री देव वेताळ मंदिर व श्री देव सातेरी मंदिरातील देवीच्या मांडाकडे खणा नारळाची ओटी भरतात.या उत्सवाला गावातील प्रत्येक घराघरातील थोरा मोठयापासून लहानापर्यंत तसेच त्या गावच्या मुली (माहेरवाशीण) पे पावणे मित्र मंडळी प्रामुख्याने मुंबईतील मित्र मंडळी आपल्या परिवारासह देवीच्या मांड उत्सवात सामील होतात. तिस-या दिवसापासून गावातील लोक आपल्या मनातील अडीअडचणी,संकटे वगैरे गोष्टी अंगात आलेल्या वारी रुपी श्री देव वेताळ,श्री देवी सातेरी,श्री देव रवळनाथ श्री देवी पावणाई आणि श्री देव दांडेकर यांना सांगुन सोडवल्या जातात.काही विशिष्ट गोष्टी श्री देव वेताळ मार्फत पुरविल्या जातात.रोज लोकांची अडीअडचणी कामे ग्रामदेवता कडून सोडवली जातात.त्यावेळी देवताकडून सुचविलेला मार्ग देवळाच्या पायरीवर घाडी,राऊळ,बारा पाच सेवकाच्या मार्फत संध्याकाळी 7 ते 10 वाजे पर्यंत मांडाच्या 14 दिवसा पर्यंत चालू असतात. याचप्रमाणे रोज संध्याकाळी श्रीदेवी सातेरी मंदिराच्या पायरीवर या देवळातील वारी रुपातील ग्रामदेवतानी सांगितलेले लोकांच्या प्रश्नावरील उपाय तोड केली जाते.या दोन्ही देवळातील गा-हाण्याचे उत्पन्न दोन्ही देवळांना मिळते. चौथ्या दिवसांपासून मांडाकडे भरल्या जाणा-या ओटया हया प्रत्येक घरातील तर काही नवसाच्या असतात.तर काही ओटया पाहुण्यामंडळीच्या असतात. प्रत्येक रात्री दिंडी श्री देव वेताळ मंदिरापासून श्री देवी सातेरी मंडळीपर्यंत वारीरुपांत ग्रामदेवतांबरोबर भरघोस लोकांच्या उपस्थितीत निघते.श्री सातेरी देवी मंदिराकडे दिंउी आल्यावर गा-हाणे घातले जाते याला " जापसाल " असे म्हणतात.देवीच्या पाषाणावरील फुल राऊळ दिंडी बरोबर आलेल्या वारीरुपी आलेल्या श्री देवी सातेरीच्या हातात देतो व ही दिंडी पुन्हा श्री देव वेताळाकडे पुन्हा आल्यावर ते फुल वेताळाच्या पाषणाकडे ठेवले जाते.जसे देव वेताळ मंदिरातून दिंडी एक दिवसआड श्री देवी सातेरी मंदिरात जाते.तसेच श्री देवी सातेरी मंदिरातील गावडे,परब,सावंत,पटेल यांच्या गावडे देवस्थान राठीतील देवता म्हणजे श्री देव ब्राम्हण,श्री देव वेताळ,श्री देवी सातेरी,श्री देव रवळनाथ श्री देव पावणाई,तसेच श्री देवी लिंगेश्वर हे देव अंगात आलेले वारीरुपी देव श्री देव सातेरी मंदिराला प्रदक्षिणा घालुन खालील मुख्य ग्रामदेवता श्री देव वेताळ मंदिराकडे येतात.त्याची अंधार रुपाने भेट झाल्यावर श्री देव वेताळाच्या पायावरील फुल परब गावंकर दिंडी मधील वारीरुपी श्री देवी सातेरीकडे देतो.दिंडी परत सातेरी मंदिराकडे आल्यावर हे फुल श्री देवी सातेरी मंदिरातील पाषाणावर ठेवले जाते.असा हा दिंडीचा कार्यक्रम 13 रात्री पर्यंत चालू राहतो. उत्सवाच्या बाराव्या दिवशी ब्राम्हण भोजनाचा देवळांत दोन्ही देवळात महाप्रसाद असतो.ब्राम्हण भोजनानंतर रात्री श्री देव वेताळ मंदिरात लक्षदीप उत्सव साजरा करतात.भाविक मंडळीच्या तेलाच्या पणत्या प्रत्येकी रु.21/- या देणगी रुपयाने घेऊन सर्व देवळांमधून वेगवेगळया कलाकृतीने एकाच वेळी सर्व देऊळ परिसरात पेटवल्या जातात.हा सोहळा रात्रीच्या वेळी विलक्षण सुंदर आणि आनंद देणारा असतो. तेराव्या रात्री एक परंडी समवून ठेवली जाते.तिचे पुजन करतात असे प्रकारे 14 दिवसात श्री देव वेताळ मंदिर व श्री देवी सातेरी मंदिर या दोन्ही मंदिरात भव्य दिव्य मांड उत्सव भरविला जातो.मांड उत्सवाची सांगता झाल्यावर श्री देवी सातेरी कौल घेवून देवीचा गोंधळ घातला जातो.या गोंधळाला त्यावर्षीचे मानकरी बसतात.प्रथम गोंधळी येऊन देवीसमोर गोंधळ आखतात.त्यानंतर मंदिरातील मानक-याच्या हस्ते श्री वेताळ व देवी सातेरी मंदिरात नैवेदय मानविला जातो.त्यानंता मानक-यांच्या हस्ते ओटया भरण्यात येतात.व नंतर गावातील इतर मंडळी ओटया भरतात व गोंधळाला सुरुवात होते.देवासमोर मानविलेला नेवैदय उपस्थितीना प्रसाद म्हणून दिला जातो.गोंधळाची पुजा झाल्यावर सर्व उपस्थितीत भाविक मंडळी दिवटीवर तेल सोडतात.रात्रभर गोंधळ सुरु होतो.गोंधळाची सांगता करताना मानक-यांच्या हस्ते गोंधळास कोबडा भक्ष दिला जातो.गोंधळी तो भक्ष देऊन श्री देवी सातेरी मंदिराच्या मागील बाजूस वाघ आला वाघ आला असे ओरडत सांकिणी डांकिणीच्या पाषाणाकडे जातो.तेथेच गोंधळाची सांगता होते. चौदाव्या दिवशी दुपारी चार वाजता दोन्ही देवळातून देवांची वारी आल्यावर उत्सवाची सांगता करण्यासाठी श्री देव वेताळ श्री देवी सातेरीला आवाहन करतो.जो मांड ओटीने भरला असतो तो प्रथम मानक-यांच्या पदरात मानाचा नारळ दिल्यावर सर्वप्रथम स्थापनेवेळी पाटावर मांडलेल्या ओटी परडीत ठेवण्याची परवानगी वारीरुपी श्री देव सातेरीला देतो.ही ओटी परडीत ठेवल्यावर परडी घाडी समाजाच्या पुरुषाच्या डोक्यावरुन विसर्जनाला नदीवर घेऊन जातात.नदीवर ही परडी आणि सर्व वारीरुपी देवतांचे विसर्जन होते.अशा प्रकारे श्री देवी सातेरी मंदिरातील देवीच्या मांडाचे विसर्जन केले जाते. श्री देव वेताळ मंदिर आणि श्री देवी सातेरी मंदिरातील मांडाकडे चौदा दिवसात भाविकांनी भरलेल्या ओटया मानक-यांना वाटल्या जातात.जर काही चांगल्या साडया या तरंगासाठी ठेऊन बाकीच्या साडया पिताबंर देवळाच्या ट्रस्टकडे दिल्या जातात.तिथे उपस्थित पै पाहुणे ग्रामस्थ मंडळी ग्रामपंचायत,शाळा,कॉलेज,शासकीय कर्मचा-यांना प्रसाद म्हणून नारळ दिले जातात.चौदा दिवस पेंडूर गावाला तिर्थक्षेत्राचे स्वरुप आलेले असते.अशा त-हेने चौदा दिवसांचा उत्सव ग्रामस्थांच्या एकत्र संघटनेतून संपन्न होतो.

Visits:1479
Total: 21262
Translate »
Pendur village Sindhudurg