Vijaydurg

vijaydurg fortVijaydurg Fort , Vijaydurg-Devgad

कोल्हापूरचा शिलाहार राजा भोज याने इ.स. ११९३ ते इ.स. १२०६ दरम्यान हा किल्ला बांधला राजा भोजान कोंकण प्रांतावर आपले वर्चस्व प्रस्तापित केल्यानंतर त्याचा रीयालदार वली बेग हा होता. त्याच्या देखरेखीत  एकंदर १६ किल्ले बांधण्यात आले. तर काही किल्ल्यांची डागडुजी करण्यात आली. इसवीसन१२१८ मध्ये देवगिरीच्या यादवांनी शिलाहार राजाचं राज्य ताब्यात घेतलं. तेव्हा पासून स.न.१३३४ पर्यंत किल्ला यादावांकडे होता. यादवांचा विजयनगरच्या साम्राज्याकडून पराभव झाल्या नंतर हा किल्ला १४३१ पर्यंत विजयनगर साम्राज्यात होता. स.न.१४३१ मध्ये बहामनी सुल्तान शाहीने विजयनगरचा पाडाव करून या किल्ल्यावर स.न.१४९० पर्यंत आपला अंमल ठेवला इ.स. १४९० ते इ.स. १५२६ दरम्यान बहामनी राज्याचे तुकडे झाल्यानंतर कोंकण प्रांतासह या किल्ल्याचा ताबा विजापूरच्या आदिलशहा कडे गेला. इ.स. १५२४ ते १६५३ अशी सलग १२५ वर्षे तो आदिलशाही अमला खाली होता.त्यांच्या कडून छत्रपती शिवाजी महाराजांनी तो जिंकून घेतला. नंतर सलग एकशे तीन वर्षे म्हणजेच १४ फेब्रुवारी १७५६ पर्यंत तो मराठी सत्तेचा मानबिंदू होता. १७५६ साली इंग्रज आणि पेशवे यांच्या विरुद्ध तुळाजी आंग्रे अशी वादग्रस्त आणि दुर्दैवी लढाई झाली.
© 2019: Sindhudurg | Travel Theme by: D5 Creation | Powered by: WordPress