Bharadi Devi

Anganewadi Shri Devi Bharadi

Anganewadi is known as the Pandharpur of Konkan. The name Anganewadi indicates a dominance of people with the surname Angane. According to a legend a Goddess materialized in the village in the form of a stone plaque, 400 years ago. Since then people have been flocking to this village for ‘Darshan’, every year. There is no fixed day or date for the fair. It is decided by consensus.

Shree Devi Bhardi, Aaanganewadi

 

मालवण शहरापासून १५ की. मी. वर आडारी पूल, महान गाव मागे टाकल्या नंतर मालवण – बेळणा – कणकवली या राज्य मार्गावर वसलेली वाडी म्हणजेच देवी भराडी च्या अधिवासाने पावन झालेली आंगणेवाडी होय. या ठिकाणी जवळपास आठ लाख भाविक यात्रोत्सवासाठी येतात. त्यामुळे या एक दिवसासाठी या यात्रेचे नियोजन कसे चालते, येथील लोकांचे वेगळेपण,चाली रीती आदि गोष्टींबाबत माहिती घेणे क्रमप्राप्त ठरेल.आंगणेवाडीत प्रवेश करण्यासाठी या मुख्य रस्त्या सोबतच मसुरे येथून दत्त मंदिर मार्गे व कांदळ्गाव तसेच बागायत मार्गे रस्ते आंगणेवाडीत येतात.येथील ९५ ट्क्के ग्रामस्थ ‘ आंगणे ’ या आडनावाचे असल्यानेच त्यांची वस्ती असलेली वाडी म्हणजेच आंगणेवाडी होय. मसुरे गावातील या वाडीस त्या मुळेच आंगणेवाडी हे नाव पडले.

जिल्ह्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला गाव म्हणजे मसुरे होय.या गावातील एकूण १५ महसूली गावांपैकी आंगणेवाडी हा एक महसूली गाव होय. मसुरे ग्रामपंचायतीच्या पाच वॉर्ड पैकी आंगणेवाडीचा समावेश वॉर्ड क्रमांक एक म्ध्ये होतो. येथील एकूण लोक्संख्या ३५० असून १७२ पुरूष १७८ महिला आहेत.एकूण मतदारांची  संख्या २४३ असून पुरूष मतदार १०५ तर महिला मतदार १३८ आहेत. येथील घरांची संख्या १६० आहे. आंगणेवाडीचे एकूण क्षेत्रफळ ५३८ हेक्टर आहे. शेती खालील क्षेत्र १६१ हेक्टर, जंगल १८ हेक्टर, तर पडिक जमिन साधारण १९२ हेक्टर आहे. गावातील एकूण कुटुंबांची संख्या १२३ आहे. आंगणेवाडीला लागणारी पाण्याची गरज ५८ खाजगी विहीरी, दोन सार्वजनिक विहीरी, चार विधन विहीरी मार्फत भागविली जाते. महसूल विभागाचे एक तलाठी कार्यालय येथे आहे.शैक्षणिक सोई संदर्भात आंगणेवाडी येथे एक अंगणवाडी,पहिली ते चौथी साठी जिल्हापरिषदेची प्राथमिक शाळा आहे. माध्यमिक शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना बिळवस माध्यमिक विद्यालय येथे जावे लागते. संपूर्ण ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत हागंदारीमुक्त गावाची संकल्पना जवळपास शंभर टक्के पूर्ण झाली आहे. गावात सतरा ठिकाणी  स्ट्रिट लाईट तसेच सौर पथदिपांची सोय आहे.

झुंझार पेडणेकर

© 2019: Sindhudurg | Travel Theme by: D5 Creation | Powered by: WordPress