Sant Bhumi

Tembe Swami, Mangaon

परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराज

परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराज की जय!

श्री क्षेत्र माणगाव (जि. सिंधुदुर्ग, महाराष्ट्र) येथे सन १८५४ मध्ये परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराज यांचा टेंबे घराण्यात जन्म झाला. त्यांचे जीवन म्हणजे अद्भुत, विलक्षण अवतारी पुरुषाचे आदर्शपूर्ण चैतन्यमय चरित्र आहे. एकात्म आध्यात्मिक भारतीय राष्ट्रवादाचे प्रतिक म्हणजे स्वामीमहाराजांचे व्यक्तिमत्व, वाङ्मय, आणि जीवनदृष्टी आहे. श्री स्वामिनी संपूर्ण भारतात पायी अनवाणी भ्रमण केले. या प्रवासात सदैव ध्यान, तपश्चर्या, लेखन व प्रवचन असा त्यांचा नित्यनेम होता. “निसर्गाकडे चला” असा संदेश त्यांच्या पवित्र तीर्थक्षेत्र, नद्या यांच्या वर्णनावरुन अनुभवाला येतो.

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज || || अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी || || श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

संत शिरोमणी देव मामलेदार यशवंतराव महाराज

संत शिरोमणी देव मामलेदार यशवंतराव महाराज यांचा जन्म ता. १३ सप्टेंबर १८८५ इ. सन रोजी पुणे जि. पुणे या गावी झाला. श्री. रा रा धोंडोनारायण भोसेकर हे श्री महाराजांचे आजोबा रूग्वेदी ब्राम्हण घरंदाज व सदाचार संपन्न परमदेवधर्मी होते. त्यांचे कुलदैवत श्री नरहरी होते. धोंडोपंतांना एकच महादेव नावाचा मुलगा होता. तेच हे महादेव महाराजांचे पिता होय. व सौ. हरिबाई ह्या श्री महाराजांच्या मातोश्री होय. सौ. हरिबाई व श्री रा रा बाळाजी मकाजी वाजपे. श्री पेशवे सरकारचे दिवाण माणकाश्वर यांचे हे कारभारी होते.

 

प.पु. देवमामलेदार यांच्या पादुका १९३८मध्ये यांचे शिष्य प.पु . सीताराम मयेकर यांनी सुकळवाड येथे स्थापन केल्या.

|| सीताराम महाराज ||

महाराजांच्या मुंबई मुक्कामात एका मुमुक्षुला महाराजांच्या कृपाप्रसादाची अवीट गोडी चाखावयास मिळाली. सीताराम झिलु मयेकर हे त्याचे नाव. सावंतवाडी संस्थानातील मालवण रस्त्यावरील सुकळवाड येथील हा तरुण चित्रकार व्यवसायानिमीत्त मुंबईस आला गेला. संसाराच्या रामरगाडयाबरोबर रामनामाची धूनही त्याच्या पाठीशी होती. नामस्मरण, भजनाची आवड यामुळे साहजिकच साधु संतांच्या दर्शनाचा छंदही सीतारामच्या मनाला जडला होता. महाराजांच्या पायावर डोके ठेवताच सीताराम ब्रम्हतन्मय स्थितीत जवळजवळ दिड घटका होता. “बाळ नारायणा स्वस्वरुपाच्या चिंतनात नारायण नामोच्चाराने अखंड आनंदाचा सतत स्वाद घे.” महाराजांनी आशिर्वाद दिला. “हे देवाधिदेवा, आपणच नारायण स्वरुप आहात मी ही त्याचाच अंश असून त्याच नारायणत्वाचा सर्वव्यापी प्रत्यय आपले दर्शन घेतल्यापासुन येत आहे. हे गुरुमाऊली ह्या दासानुदासावर कूर्म दृष्टीने कृपा असु द्या.” सीतारामाने प्रसादाची पावती दिली. महाराज हसुन म्हणाले, “रंगसंगती तर उत्तम जमली आहे. विसंगती कुठे दिसत नाही. सप्तरंगांच्या विलक्षण “रंगसंगतीने अविस्मरणीय व सर्वसुंदर चित्र तयार होते. पण त्याहीपुढे जाऊन सप्तरंगांच्या विलक्षण मिश्रणाने प्रकाशाचा रंग तयार होतो. प्रकाशरुप परमात्मा तुझे सर्व जीवन अध्यात्म प्रकाशमान करो. सप्तस्वराच्या लयीत परमात्म्याच एक सुर लागो. सुधामृत सागरात श्रीगुरु माऊलीचे बोट धरुन अथांगतेचा व अनंतत्वाचा अनुभव घेत असल्याचे सीतारामाला जाणवले. पुन्हा एकदा सदगुरुंचे पाय धरुन चरणधुळ मस्तकाला लावली. व चित्रकार आत्मचरिज्ञ होऊन बाहेर पडला. घरी परततांना सीताराम महाराजांच्या अंतरसाक्षीत्वाने पुर्णपणे भारावुन गेला होता. सीतारामला अंतरीची खुण पटली होती. सीताराम संसारात राहुनही ब्रम्हनंदात राहण्यासाठी पुढे वाटचाल करु लागला.

सद्गुरु साटम महाराज, दानोली

Tal Sawantwadi, Dist Sindhudurg

प. पू. राणे महाराज यांचे मुळ नाव लक्ष्मण राघो राणे .

१५ ऑक्टोबर १९२८ रोजी मालवण तालुक्यातील कुणकवळे येथे त्यांचा जन्म झाला. त्याचे मुळ गाव कांदळगांव. सिंधुदुर्ग जिल्हय़ातच शिक्षण पूर्ण करून ते लष्करामध्ये सहभागी झाले. मात्र तेथील अधिका-यांशी न पटल्याने लष्कराचे शिक्षण अर्धवट सोडून ते गिरनारला गेले.

Image result for bhalchandra maharaj kankavli

भालचंद्र महाराज, कणकवली

वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण या गावी श्री. परशुराम ठाकूर आणि सौ. आनंदीबाई या मात्यापित्यांच्या पोटी ८ जानेवारी १९०४ या वर्षी प.पू. भालचंद्र महाराजांचा जन्म झाला. बाबांचे काही जीवन मुंबईत गेले. लहानपणीच मातापित्यांचे देहावसान, मॅट्रीकच्या परिक्षेत आलेले अपयश, यामुळे निराशा आलेल्या बाबांच्या जीवनात अचानक वैराग्य प्राप्त झाले. त्या स्थितीत भालचंद्रबाबा एक दिवस गारगोटी, कोल्हापूर येथे गेले. तेथे गारगोटीचे एक साक्षात्कारी योगीपुरुष मुळे महाराजांच्या सान्निध्यात आले. मुळे महाराजांनी बाबांना सावंतवाडी तालुक्यातील दाणोली येथे जाऊन तेथील संत प.पू. साटम महाराज यांची सेवा करण्यास सांगितले. त्यानुसार बाबा दाणोलीत आले. तेथे प.पू. साटम महाराजांची सेवा केली. काही कालावधीनंतर बाबा १९२६ या वर्षी कणकवलीत आले.

प्रारंभी जुन्या मोटारस्टँडवर किंवा श्री काशीविश्‍वेश्‍वर मंदिरापाशी ते एकटेच बसलेले दिसत. कधी एखाद्या झाडाच्या बेचक्यात ते बसलेले असत. कोणाशी बोलत नसत, हसत बसत, काही दिले, तर घेत नसत. त्यांना काही खायला दिले तर दोन दोन दिवस, तसेच पडून रहात असे.

पुढे ते सहसा श्री काशीविश्‍वेश्‍वर मंदिरानजिकच्या प.पू. कामत महाराजांच्या समाधीच्या घुमटीत बसत असत. देहभान नसल्याने मलमूत्रविसर्जनही तेथेच करत असत. हाकलले तरी जात नसत. अखेर त्यांना समाधीमंदिराशेजारी एक घुमटी तयार करून त्यात बसवले. तेथेही तोच प्रकार चालू झाला. जाणारे, येणारे देवदर्शनास आलेले त्यांची घृणा करत; पण महाराजांनी हे निमूटपणे सहन केले. महाराजांचा कशालाच विरोध नसे, असे विलक्षण वैराग्य. ते सत्पुरुष आहेत याची जरासुद्धा कल्पना त्याकाळी लोकांना नव्हती. महाराजांच्या या अवस्थेमध्ये कोणा एका खोडसाळ माणसाने त्यांना उचलून शेणाच्या गायरीत टाकले. तेथेही ते दोन दिवस तसेच होते. बाबांची कोणी चेष्टामस्करी करत, कोणी उपहास करत; परंतु बाबांना त्याचे काहीही नसे. कोण विड्या, तर कोण सिगारेट देत असत. बाबा ते फुंकून टाकीत. त्यांचा धूर गिळत नसत, तर धुराचे लोटच्या लोट हवेत पसरवीत असत.

बाबांच्या देहाचे अशा प्रकारचे हाल दाणोली येथील प.पू. साटम महाराजांच्या कानी पडले. तेव्हा ते स्वत: दोन वेळा कणकवली येथे आले आणि प.पू. भालचंद्र महाराजांना भेटले. प.पू. साटम महाराजांनी प.पू. भालचंद्र महाराजांची महती, आध्यात्मिक सामर्थ्य याची प्रचीती समाजास दाखवून दिली. दोन महान योग्यांची भेट झाली आणि लोक भानावर आले. हळूहळू प.पू. भालचंद्र महाराजांना लोक नमस्कार करू लागले; पण खरी जनजागृती केली ती गारगोटी येथील श्री मुळे महाराजांनी. ते चहाचे व्यापारी होते. त्यामुळे सर्वत्र त्यांचे फिरणे असायचे. कणकवली येथे आल्यावर प.पू. भालचंद्र महाराजांना त्यानी ओळखले. त्यांनी महाराजांची महती सर्वांना सांगितली. त्यानंतर लोकांनी बाबांची पूजा करण्यास प्रारंभ केला.

प.पू. भालचंद्र महाराजांचे मूळ गाव कुडाळ तालुक्यातील म्हापण हे होय. तेथे ते शाळेत गेल्याचीही नोंद आहे. धर्मराज महाराज, फलाहारी महाराज, प.पू. राज अहमद हुसेनशहा पटेलबाबा हे प.पू. भालचंद्र महाराजांचे शिष्य होते. प.पू. भालचंद्र महाराजांच्या उत्सवाच्या निमित्ताने बाबांच्या आठवणींचा हा जीवनपट भावपूर्णरित्या न्याहाळत असतांना जाणवते की, कणकवलीमध्ये या सत्पुरूषाचे आगमन झाले आणि त्या दिवसापासून कणकवली गावचे सर्व रूपच पालटले.

बाबांना काहीजण वेडे समजत होते. एखादा ज्ञानी माणूस बाबांना ओळखून त्यांची पूजा करायचा. कोणी नमस्कार केला, तर त्याला चमत्कार बाबांनी दाखवला. अशा प्रकारे बाबांची किर्ती सर्वदूर पसरू लागली. जो जे मागेल ते बाबा त्यांना देत गेले. आज भक्तांना विचारले, तर विशेषत: कणकवलीवासियांना विचारले, तर ते सांगतील, आमच्या समस्या, दु:ख, त्रास आम्ही बाबांजवळ मांडले आणि आम्ही चिंतेतून मुक्त झालो. त्यांच्या केवळ दर्शनानेच अनेकांना सुखशांती लाभल्याची उदाहरणे आहेत.

मुंबई-लालबाग येथे श्री हनुमान मंदिरात १६ डिसेंबर १९७७ या दिवशी अखंड हरिनामचा जयघोष चालू होता. रात्री १०.२५ वाजता भक्तांना दर्शन देत असतांनाच ते अनंतात विलीन झाले. बाबांचे पार्थिव कणकवली येथे आणले गेले. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला (१८ डिसेंबर १९७७) सध्याच्या आश्रमातील मध्य गाभार्‍यात वेदमंत्रघोषात समाधी देण्यात आली.

कणकवली येथील आश्रमात प.पू. भालचंद्र महाराज आश्रम समिती कार्यरत असून ती नोंदणीकृत आहे. या आश्रम समितीने जोडोनिया धन, उत्तम व्यवहारे । या उक्तीप्रमाणे बाबांच्या भाविक भक्तांनी दिलेल्या देणग्यांचा योग्य विनियोग करून धार्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक कार्य हाती घेतले आहे

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

🌺 *!! अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त !!*🌺

🌹 *।।ॐ नमो भगवते भालचंद्राय।।*🌹

#परमहंस_भालचंद्र_महाराज_कणकवली
#११५_वा_जन्मोत्सव_सोहळा
#२२_ते_२६_जानेवारी २०१९

© 2019: Sindhudurg | Travel Theme by: D5 Creation | Powered by: WordPress