पावनाई- भगवती मंदिर Bandivade

सुमारे ३५० वर्षा पूर्वीचे हे पुरातन मंदिर मूळ भगवतीचे म्हणून ओळखले जाते. सुमारे ५५ते६० लाख खर्चून इसविसन २००७ मध्ये या मंदिराचा जिर्णोधार झाला. मे २००७मध्ये  ततत्कालीन पालकमंत्री नामदार माननीय नारायण राणे यांच्या शुभ हस्ते उदघाटन सोहळा पार पडला.

या मंदिराची पिठीका अशी आहे की, हे मंदीर भगवतीचे. तुळजापूरची भवानी भगवतीच्या  भेटीस आली. भगवतीने तिला बसावयास आसन दिले. भवानी पाहुनी म्हणून आली आणि तिथेच स्तायिक झाली.भक्तांच्या नवसाला पाऊ लागली. माहेर वासिनीच्या हाकेला धाऊ लागली. म्हणून तिचे नाव पावणाई  म्हणून नंतर त्या मंदिराची ओळख पावनायी- भगवती मंदिर अशी झाली.

ह्या मंदिरात भवानी मातेचा मुख्य उत्सव ‘देवीचा महागोधळ ‘ हा दरवर्षी पौष महिन्यात साजरा केला जातो. कोल्हापूरचे श्री शाहू संस्तान कडून दर वर्षी ६० /- रुपये मदत मिळत असे. नंतर संस्थान खालसा झाल्या नंतर ही मदत मिळणे बंद झाले. तरीही गावकरी मंडळीनी हा गोंधळ चालूच ठेवला. गोंधळा व्यतिरिक्त मंदिरात नवरात्र उस्तव, नाम सप्ताह , दसरा आदी उत्सव साजरे केले जातात.

Temple in malvan

अधिक माहिती 

© 2019: Sindhudurg | Travel Theme by: D5 Creation | Powered by: WordPress