आंगणेवाडी श्री देवी भराडी

आंगणेवाडी श्री देवी भराडी – मालवण शहरापासून १५ की. मी. वर आडारी पूल, महान गाव मागे टाकल्या नंतर मालवण – बेळणा – कणकवली या राज्य मार्गावर वसलेली वाडी म्हणजेच देवी भराडी च्या अधिवासाने पावन झालेली आंगणेवाडी होय. या ठिकाणी जवळपास आठ लाख भाविक यात्रोत्सवासाठी येतात. त्यामुळे या एक दिवसासाठी या यात्रेचे नियोजन कसे चालते, येथील लोकांचे वेगळेपण,चाली रीती आदि गोष्टींबाबत माहिती घेणे क्रमप्राप्त ठरेल.आंगणेवाडीत प्रवेश करण्यासाठी या मुख्य रस्त्या सोबतच मसुरे येथून दत्त मंदिर मार्गे व कांदळ्गाव तसेच बागायत मार्गे रस्ते आंगणेवाडीत येतात.येथील ९५ ट्क्के ग्रामस्थ ‘ आंगणे ’ या आडनावाचे असल्यानेच त्यांची वस्ती असलेली वाडी म्हणजेच आंगणेवाडी होय. मसुरे गावातील या वाडीस त्या मुळेच आंगणेवाडी हे नाव पडले.


Leave a Reply

© 2019: Sindhudurg | Travel Theme by: D5 Creation | Powered by: WordPress