काती कुमारी देवी. कन्या कुमारी देवी

केरळ व्हाया मसुरे कावा

Image may contain: flower and foodआज सगळ्या नॅशनल चँनल वर केरळच्या सबरीमला देवस्थानाच्या बातम्या चालू आहे. एकाने मला विचारलं, मराठी चॅनलवर केरळच्या देवाचे कशाला ? मी म्हटल असे काही नसते रे. आणि आपण जिथे प्रश्न उपस्थित करतो ना तेव्हा उत्तरं आपल्या जवळच मिळतात.. आज मी एका केरळच्या देवीबद्दल लिहिणार आहे. अनेकांना वाटेल मालवणच्या देवी बद्दल लिवक नाय सा आज ? मिळतील सगळी उत्तरं मिळतील..

मालवण तालुक्यात मसुरे गावात एक वाडी आहे. मसुरे कावा वाडी. याच वाडीत एक देवीचे मंदिर आहे काती कुमारी देवी. मला खूप दिवस प्रश्न पडायचा. कडक गावराठी असणाऱ्या माझ्या मसूरे मध्ये हे थोडसं कन्या कुमारी देवी सारखं नाव कसे? पण म्हटलं आज लिहुयाच..

ही गोष्ट आजची नाही, खूप वर्षांपूर्वीची आहे. मुळात भौगोलिक दृष्ट्या अगदी पूर्वीपासून सधन असणारी मसुरे ही व्यापारी पेठ आणि कदाचित त्या सधन पणातून आलेली वस्ती यातून फुललेला हा हिरवा गार पट्टा. याच मसुरे कावा वाडीत केरळ मधून एक माणूस आपले देव घेऊन आला.. कदाचित त्या देवीच्याच मनात भारताची स्वर्गभूमीहुन महाराष्ट्राच्या देवभूमीत यायचं असेल म्हणा.. या गोष्टी कधीही स्वताच्या मनाने घडत नाहीत. त्याचे दैवी संकेत असतात. ज्यांना पटत नसेल त्यांनी गोकर्ण महाबळेश्वर ला एकदा जाऊन यावं. असो ..

तर फार वर्षांपूर्वी व्यक्ती आपली देव घेऊन आली. काती म्हणजे स्थानिक भाषेत माडी पाडायचा विशिष्ट कोयता. त्या व्यवसायाला, त्या समाजावर या देवीचे लेकराप्रमाणे प्रेम आहे. मी आता तामिळनाडू आणि केरळच्या मीडियातील पत्रकार मित्राना या बद्दल विचारलं. त्या सामाजिक रचनेत काती कुमारी देवीबद्दल प्रचंड मोठं स्थान आहे.

आज ही मसुरे भागात गावराठीच्या देवस्थानात काती कुमारी देवीचे उत्सव आणि मानपान यांचा समावेश आहे. अजूनही नदीवाऱ्यापासून रक्षण करणारी ही देवी अशीच मान्यता आहे. काती कुमारी देवीचे मूळ स्थान आणि

Image may contain: tree, sky, outdoor, nature and water तिच्या कावा प्रवासाबद्दल नंतर कधी तरी लिहीन. भगवंतगड आणि भरतगड यांच्या मधोमध वाहणाऱ्या रमाई आणि गड नदीच्या संगमावर असणारे हे काती कुमारी आईचे ठिकाण एक खूप इतिहास आणि भूगोलाची गोष्ट शोधायला तुमची वाट पाहतेय.

पण यात एक गोष्ट मात्र नक्की आहे. अजूनही आपण विजयादशमीला घरातील पारय, पिकाव, कोयता यांचे पूजन करतो. या प्रत्येकात एक दैवत स्वरूप आहे. निदान काती कुमारीने कोयत्याचे दैवी रूप आज स्पष्ट केले आहे. तुम्ही पाहिलं असेल हे काती कुमारी मंदिर.. नाही पाहिलं असेल तर दसऱ्याच्या मूहुर्तावर देवीचे दर्शन नक्की घ्या आणि हो ये

ताना मसुरे चा प्रसिद्ध दसरा उत्सव पण नक्की अनुभवा..
आणि हो नाहीच जाता असेल तर देव्हाऱ्याखाली दसऱ्याला पाटावर कोयता मांडालात तर आठवणीने एक हळदी कुंकवाचे बोट नक्की लावा.. कारण काती देवी फक्त केरळात नाही प्रत्येक घराघरात असते अन्नपूर्णेसोबत, घरच्या गृहलक्ष्मीला कर्त

Rishi Shrikant Desai 's Profile Photo

Rishi Shrikant Desai

व्य सिद्धता देत..

(तूर्त एवढेच, लिहीन सविस्तर नंतर कधीतरी.. सोबत दोन फोटो दिले आहेत. एक फोटो काती कुमारी देवीचा

आणि दुसरा कोकण कोकण म्हणून अवघ्या सोशल मीडियावर जो फोटो व्हायरल होतो ना मुळात जिथला आहे तो मसुरे कावा वाडीच्या संगमा जवळचा आहे. बाय द वे तिरुपती तामिळनाडू केरळची देव देवता पाहणाऱ्यानी एकदा मालवणचे देवाचे फोटो टाकले ना तर उद्या गावागावात पण तिकडचे पर्यटक पण येतील की आणि साऊथ वाले पण आपल्या fb वर पोस्ट टाकतील .. फ़िल्लिंग डिव्होशनल @ मसुरे कावा

)

© 2019: Sindhudurg | Travel Theme by: D5 Creation | Powered by: WordPress