बारा पाचांची राठी

पाच मानकरी आणि त्यांची नावे अनुक्रमे खालील प्रमाणे आहेत.

  • रायकर परब
  • मसणे परब
  • सावंत पटेल
  • सावंत
  • कुळकर्णी
Shree Dev VeteL

देवस्थान कमिटी

  • श्री.शिवराम सावंत-पटेल  अध्यक्ष 
  • श्री. अमित रेगे-कुलकर्णी  सर-चिटणीस 
  • श्री.सुनिल परब खजिनदार 
  • श्री.दिलीप परब  विश्वस्त 
  • श्री.नंदकुमार परब विश्वस्त
  • श्री.बिपीन परब विश्वस्त 
  • श्री.दाजी सावंत विश्वस्त 
  • श्री.प्रमोद सावंत विश्वस्त 
  • श्री.रमेश सावंत विश्वस्त  

श्री देव वेताळ

पेंडूर गावातील मुख्य देव श्री देव वेताळ, सातेरी,  पावणाई, रवळनाथ, लिंग ही प्रमुख देवस्थान आहेत. त्याच प्रमाणे इतरही देवस्थान आहेत ही सर्व राठींशी संलग्न आहेत. पेंडूर गावातील राठी ३०० वर्षांपेक्षा जुनी आहे. या मध्ये पाडव्यापासुन पाडव्या पर्यंत सर्व सण साजरे केले जातात. त्यासाठी प्रत्येक मानकरी प्रत्येक भावामध्ये एकेक वर्ष आलटून पालटून सण साजरे करतात. यात पाडवा, दसरा, दसऱ्याच्या आदल्या दिवशी उपार असते. आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी माघारपणाला रवळनाथ मंदिरात जातात.आणि दसऱ्यादिवशी खाम्बकाठी परत श्री  वेताळ मंदिरात येते. अशी प्रथा गेली ३५० वर्ष चालू आहे. 

तसेच देवीचा मांड एक वर्ष आड येत असतो. देवीचा मांड साजरा करताना पाच मानकरी, १२ सेवेकरी आणि ट्रस्ट सर्व मिळून साजरा करतात. यात अशी प्रथा आहे. कि श्री देव वेताळ पौष महिन्यात  आपल्या बहिणीला खरारे येथून  माघारपणाला आणायला जातो. खरारे येथुन आपल्या बहिणीला आणल्यावर १४ दिवस देवी येथे वास्तव्यास असते ह्या काळात मांड उत्सव साजरा होतो. 

Visits:164
Total: 21269
Translate »
Pendur village Sindhudurg